कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटी, गौतमनगर

पो.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर
www.kskes.org.in

    कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक माजी खासदार मा. शंकररावजी काळे साहेब हे शिक्षणमहर्षी व समाजसुधारक आणि दुरदृष्टीकोन असलेले व्यक्तिमत्व, त्यांनी या शैक्षणिक संस्थेची एकहाती पायाभरणी केली. त्यांनी १९७० साली अतिशय लहान अशा रोपटयाची लागवड केली होती, परंतू आज त्याच लहान रोपटयाचे भव्य अशा वटवृक्षात रुपांतर झाले आहे. या संस्थेच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक (KG) शिक्षणापासून ते पदव्यूत्तर शिक्षणापर्यंतचे उत्कृष्ट असे शिक्षण ग्रामीण भागात दिले जाते.

    आज कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक नामवंत शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच ही संस्था उत्कृष्ट अशी सेवा देण्यास कटीबद्ध आहे. कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटीमध्ये काम करत असताना आम्ही एक सांघिक प्रेरणा, सर्वस्वी त्यागाची भावना, प्रामाणिकपणा आणि नवउर्जेद्वारे आम्हाला निर्माण करण्यासाठी संपूर्ण संस्था ही एक कुटूंबाप्रमाणे काम करते व तिच्या उच्च अशा विद्या शाखा आहेत. आम्ही विश्वास ठेवतो की आवश्यकतेच्या पलिकडे असणारे शिक्षण देणे, चौकटीच्या बाहेर जाऊन उत्कृष्टता प्रदान करणे आणि अपेक्षेच्या पलिकडे यश मिळवणे येथे विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी व त्यांच्या संपूर्ण जीवनभराची शिदोरी बनण्यास त्याचप्रमाणे समाजातील काळानुरुप होणा-या परिवर्तनाशी साजेशे असे शिक्षण आम्ही देतो. 

                                                             - दृष्टीकोन - 

कर्मवीर शंकरराव काळे एज्यूकेशन सोसायटी ही राष्ट्रीय मानांकन, आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन डोळयासमोर ठेऊन उच्च् अशा विद्याशाखा, शैक्षणिक स्वातंन्न्य त्याद्वारे नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती जोपासणे आणि सर्व प्रकारचे मुल्ये रुजवणे व त्यावर विश्वास निर्माण करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे. 

शैक्षणिक संस्था एकाच छत्रछायेखाली

गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर 

पो.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर

Mobirise

     

                                - शाळेची ठळक वैशिष्टये –

१) साईबाबांच्या पावन आणि पवित्र अशा भूमिपासून अवघ्या १८ कि.मी.  

    अंतरावर कोळपेवाडी येथे स्थित.

२) निसर्गरम्य अशा वातावरणात भव्य अशा १०० एकराच्या परिसरात

     विस्तीर्ण.

३)हिरव्यागार झाडांनी नैसर्गिक सौंदर्य व्यापलेले व कायम आकर्षणाचे केंद्र

    असलेले मुलांसाठीचे क्रिडांगण.

४)संपूर्ण परिसर गर्द झाडांच्या सावलीने व्यापलेला असून विद्यार्थ्यांच्या

   अभ्यासासाठी व खेळासाठी आवश्यक असलेले निसर्गसौंदर्य आणि शांतता पूर्ण

   वातावरण.

५)सुसज्ज, भव्य आणि हवेशीर वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि सभागृह.

६)एस.एस.सी. परीक्षेच्या १००% उज्जवल निकालाची परंपरा कायम.

सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,गौतमनगर

पो.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर

Mobirise

                                            - महाविद्यालयाचे ठळक वैशिष्ट्ये –

१)साईबाबांच्या पावन आणि पवित्र अशा भूमिपासून अवघ्या १८ कि.मी.

   अंतरावर कोळपेवाडी येथे स्थित.

२)निसर्गरम्य अशा वातावरणात भव्य अशा १०० एकराच्या परिसरात

   विस्तीर्ण.

३)हिरव्यागार झाडांनी नैसर्गिक सौंदर्य व्यापलेले व कायम आकर्षणाचे

    केंद्र असलेले मुलांसाठीचे क्रिडांगण.

४)संपूर्ण परिसर गर्द झाडांच्या सावलीने व्यापलेला असून विद्यार्थ्यांच्या

   अभ्यासासाठी व खेळासाठी आवश्यक असलेले निसर्गसौंदर्य आणि

   शांतता पूर्ण वातावरण.

५)सुसज्ज, भव्य आणि हवेशीर वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि सभागृह.

६)उज्जवल निकालाची परंपरा कायम.

७)गरीब व गरजू विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजना.

८)राष्ट्रीय सेवा योजना.

९)स्पर्धात्मक परीक्षेसाठी मार्गदर्शन.

१०)मुलींकरीता स्वतंत्र अशी व्यक्तिमत्व विकास योजना.

११)शैक्षणिक सहलींचे आयोजन.


गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिटयूट, गौतमनगर

पो.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर

Mobirise

                                        - महाविद्यालयाचे ठळक वैशिष्टये -

१) प्रदुषणमुक्त वातावरण.

२) उत्कृष्ट व अद्यावत पायाभूत सुविधा.

३) गरजू विद्यार्थ्यांकरिता वस्तीगृहाची सुविधा.

४) उपहारगृहाद्वारे पौष्टीक व सकस आहार पुरविला जातो.

५) कायमस्वरूपी इंटरनेट (आंतरजाल) सुविधा.

६) सर्वसुविधा युक्त प्रयोगशाळा.

७) खेळ, चर्चासत्र, औद्योगिक भेटी यांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी

    अशा विविध उपक्रमांचे आयोजन.

८) प्रशिक्षण आणि नियुक्तीसाठी मार्गदर्शन सुविधा उपलब्ध.

गौतम सहकारी बँक लि., गौतमनगर

पो.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर

Mobirise

                                                    - बँकेविषयी माहिती -

                                    ग्रामीण भागाची कामधेनू गौतम सहकारी बँक

    ग्रामीण भागातील जनतेची बँकिंग सेवेची गरज लक्षात घेवून ग्रामीण भागाचा विकास व्हावा त्यांना बचतीची सवय लागावी, ग्रामीण भागातील उद्योग धंद्यास आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या हेतूने कारखाना उद्योग समुहाचे शिल्पकार संस्थापक आदरणीय दैवत स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, माजी खासदार यांचे प्रेरणेने सामान्य जनतेमधुन भागभांडवलाची उभारणी करून १९७६ साली बँकेची स्थापना केली. बँकेचा रजिस्ट्रेशन नं. अे.एन.आर.बी.एन.के/१३४/दि.२२.०४.१९७६ असा आहे. आज मितीस बँकेच्या वाटचालीस ४२ वर्ष पुर्ण झालेले असुन प्राप्त परिस्थीतीमध्ये बॅंक सातत्याने सभासदांचे व परिसराचे विकासासाठी कार्यरत आहे. अर्बन बँक या सदराखाली स्थापन झालेली असली तरी ख-या अर्थाने ग्रामीण भागात काम करते. त्यात शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायीक, पगारदार नोकर, छोटे व्यापारी, व वाहतुकदार ग्रामीण परीसरातील लहान मध्यम घटक व सामान्य माणसांच्या विकासासाठी कर्जपुरवठा करत आहे. त्यामुळे या परिसराची कामधेनू म्हणून आपली बँक नावारूपास आलेली आहे.

­­­­­­­­    बँकेच्या व्यवस्थापनास मा.आमदार श्री.अशोकराव काळे साहेब यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच युवानेते मा. श्री. आशुतोषदादा अशोकराव काळे साहेब यांचे अनमोल असे कुशल मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.सध्या मा.श्री. बाबासाहेब शिवाजीराव पा.कोते, रा.शिर्डी ता.राहाता, जिल्हा-अहमदनगर, हे बँकेचे विद्यमान चेअरमन असुन मा.श्री.साहेबलाल येसूलाल शेख, रा.धारणगाव, ता.कोपरगाव हे व्हा.चेअरमन पदी कामकाज पहात आहेत तर बँकेचे सरव्यवस्थापक म्हणुन मा.श्री. बापुसाहेब कान्हूजी घेमूड, रा.कोपरगाव, ता.कोपरगाव हे काम पहातात. बँकेचे कार्यक्षेत्र अहमदनगर,नाशिक,ठाणे,पुणे आणि औरगांबाद असे पाच जिल्हयाचे असुन बँकेने यशस्वी वाटचाल करून सर्व स्थरावर भरीव प्रगती केलेली आहे. मार्च २०१८ अखेर बँकेच्या मुख्य कार्यालयासह ७ शाखा कार्यरत आहेत. बँकेचे सभासद संख्या १५६३८ इतकी असुन वसुल भाग भांडवल रू. ४३२.६७ लाख इतके आहे. एकुण निधी रू. ७६१.०७ लाख इतका असुन एकुण ठेवी रू. ७७५१.८१ लाख तर बँकेने एकुण रू. ४००६.७१ लाखाचे कर्ज वाटप केलेले आहे. तर बँकेची गुंतवणुक रू. ४३२८.९० लाख आहे. बँकेस मार्च २०१८ अखेर ऑॅडीट वर्ग ‘‘ब’’ आहे. बँकेस ३१ मार्च २०१८ अखेर नफा रू. ४०.१७ झालेला आहे. एकुण सेवक संख्या ६० असुन बँकेचे खेळते भांडवल रू.९२१०.२६ लाख इतके आहे.

    बँकेचे सर्व कामकाज आर.बी.आय.च्या मार्गदर्शक सुचनानुसार संगणक CBS प्रणालीव्दारे करण्यात येत असुन बॅंकेने ठेवीला आकर्षक व्याज ठेवलेले असुन ठेवीस विमा संरक्षण आहे. मुदत ठेवीत नामनिर्देशनाची सोय असुन NEFT/RTGS सेवा तसेच आमआदमी या सज्ञेंत बँक ग्राहकांना IFSC कोड MICR कोड उपलब्ध करून देवून सर्व शाखांमधुन अल्प-व्याज दरात सोनेतारण कर्ज, वेअरहाऊस पावतीचे तारणावर कर्ज, इतर उद्योग, व्यवसायीक कर्जे, मशिनरी तारण व वाहन कर्जाची सुविधा बॅंक देत आहे. तसेच ग्रामीण भागात लॉकर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ग्रामीण भागातुन अनेकांना रोजगार व गरजुंना आर्थिक सहाय मिळत आहे. बँक विनम्र व तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. 

      आदरणीय साहेबांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या बँकेत स्व.साहेबांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करून वाटचाल करीत आहोत. तसेच बँकेच्या प्रगतीत व सुरू असलेलेल्या वाटचालीत बँकेचे सन्मा. सभासद, खातेदार, हितचिंतक व विद्यमान संचालक मंडळाचे मोलाचे योगदान मिळत आहे. 

गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा.लि.,गौतमनगर

पो.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर

Mobirise

    कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि.,गौतमनगर या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सन १९५६ मध्ये सुरु झाला. कारखान्याचे सभासदांचा तसेच कार्यक्षेत्रातील शेतक-यांचा ऊस त्यांचे शेतातून कारखान्यात गळितास आणण्याची जबाबदारी कारखान्याची असलेमुळे ऊस तोडणीकरिता ऊस तोडणी मजुर, वहातुक अशी सारी यंत्रणा कारखान्यास उपलब्ध करावी लागत असे. परंतु सन १९७१ मध्ये ऊस तोडणी मजुरांनी तोडणी वहातूक खर्च वाढवून मिळणेसाठी व इतर काही सवलती मिळणेसाठी संप केला. सदरचे संपामुळे कारखाना अडचणीत आला. साखर उद्योगात ऊस तोडणीनंतर कमीत कमी वेळेत गव्हाणीत ऊस गेला तर ऊस जेवढा ताजा तेवढा साखर कारखान्याला साखर उतारा चांगला मिळतो. त्यामुळे कारखाना उतारा तसेच शेतकरी, सभासद यांचा वजनात फायदा होतो. ऊस तोडणी वहातूक मजुरांचे संपामुळे ऊस तोडणीच्या या पारंपारिक पध्दतीवर अवलंबुन न राहता कारखान्याची ऊस तोडणी व वहातुकीसाठी स्वंतत्र यंत्रणा असावी या संकल्पनेतुन मा.श्री.शंकररावजी काळे साहेब यांचे अध्यक्षतेखाली व मा. श्री. छबुराव फक्कडराव आव्हाड, मा.श्री.पंडीतराव गंगाधर जाधव, मा.श्री.चांगदेवराव गणपतराव औताडे, मा. श्री. सहादू यशंतवा आढाव, मा. श्री.बाबुराव नामदेवराव गवारे व मा. श्री. चांगदेव सखाराम मुजगुले यांचे मार्गदर्शनाखाली सन १९७१ मध्ये ‘’गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि., गौतमनगर‘’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. कारखान्याच्या सभासदांना कर्ज उपलब्ध करुन देऊन टाटा कंपनीच्या एकदम ४० ट्रक्स टाटा कंपनीचे अधिकृत डीलर मे.स्टर्लिंग मोटर्स, नाशिक यांचेशी करार करुन खरेदी व ट्रकची बॉडी बांधणे इत्यादी कामे एकत्रितपणे केली. गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी ही कोसाका कारखान्याचे ऊस उत्पादक सभासंदाचे वतीने ऊस तोडणी व वहातूकीचे काम करते. त्यामुळे ऊस वहातूक यंत्रणा सुरळीत चालु आहे. कारखान्याचे सभासदांचा ट्रक वहातूकीचे धंद्यातुन फायदा झालेला आहे. तसेच कंपनीचे ट्रक वेळेत रिपेअर होणेकरीता ट्रकसाठी टायर्स व स्पेअर पार्टस् दुकान तसेच ट्रक निगा व दुरुस्ती गॅरेज विभाग चालु केलेला आहे. त्यामुळे ट्रकला ओरिजनल स्पेअर पार्टस् उपबल्ध होऊन व ट्रक वेळेत रिपेअर होऊन ऊस भरण्यास जातात. तसेच ट्रक धारकांचे वतीने ट्रकचा विमा, टॅक्स, आरटीओ संबंधीची कामे, पोलीस खात्याची पुर्तता,व्यवसाय कर, ट्रकचा अपघात इत्यादी कामे कंपनीमार्फत केली जातात, त्यामुळे कंपनी ट्रक धारकांचा आर्थिक फायदा होऊन त्यांचे विश्वासास पात्र ठरलेली आहे. त्यामुळे कारखान्याचे सभासदांच्या आज मितीस २०० ट्रक्स ऊस वहातूकीस चालु आहेत. कारखान्यास नियमित व ताज्या ऊसाचा पुरवठा होऊन सभासदांना शेती धंद्यास पुरक असा व्यवसाय मिळालेला आहे. कंपनीने सन १९८८ मध्ये गोदावरी प्रवरा कॅनॉल सहकारी खरेदी विक्री संघ लि.,कोपरगाव यांचा मार्केटयार्ड जवळील पेट्रोलपंप २५ वर्षाचे कराराने चालविण्यास घेतलेला आहे. सदरच्या पंपामुळे ट्रक धारकांचे ट्र्क्सला नियमित व शुध्द डिझेल उपलब्ध झालेले आहे.

    गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा.लि.,गौतमनगरचे जोडीला सिस्टर कंपनी म्हणून सन १९९९ मध्ये ‘’गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा.लि.,गौतमनगर ‘’ या कंपनीची मा.श्री.शंकररावजी काळेसाहेब यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री.छुबराव फक्कडराव आव्हाड व मा.श्री.भागवतराव रेवजी घुमरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थापना करणेत आली. सदर कंपनी गोदावरी खोरे प्रमाणेच कार्यरत आहे. 

    वरील दोन्ही संस्थेमुळे गौतम सहकारी बँक लि.,गौतमनगर व शरद पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत गौतमनगर तसेच परिसरातील व्यवसायिकांची भरभराट झालेली आहे.

शरद पवार नागरी सहकारी पतसंस्था लि.,गौतमनगर

पो.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर

Mobirise

                                            - पतसंस्थेविषयी माहीती -

विश्वासाची परंपरा जोपासणारी एकमेव पतसंस्था, ‘’शरद पवार पतसंस्था’’

    आपली पतसंस्था ही कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समुह व गौतमनगर परिसरातील छोटे व्यावसायिक, व्यापारी, व उद्योग समुहातील कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांची कामे व्हावीत, त्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे, म्हणुन कारखाना उद्योग समुहाचे शिल्पकार संस्थापक आदरणीय दैवत स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब, माजी खासदार यांचे प्रेरणेने इ.स.१९८८ साली संस्थेची स्थापना केली.

    संस्थेचा रजिस्टेशन नं. एएनआर/केपीएन/आरएसआर/सीआर/६६५/८८ दिनांक २८/११/१९८८ असा आहे. आज मितीस पतसंस्थेच्या वाटचालीस २९ वर्षे पुर्ण झालेले असुन संस्था सातत्याने उद्योग समुहातील कर्मचारी, छोटे-मोठे व्यावसायिक, शेतकरी व शेतमजुर व सामान्य माणसांच्या विकासासाठी कर्ज पुरवठा करत आहे. तसेच ठेवीदारांचे पैसे मागता क्षणी ताबडतोब दिले जातात. त्यामुळे परिसरातील विश्वासाची परंपरा जोपासणारी एकमेव पतसंस्था म्हणुन नावारुपाला आलेली आहे.

    संस्थेच्या कारभारात मा.आमदार श्री.अशोकरावजी काळे साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे. तसेच युवानेते मा.श्री.आशुतोष दादा काळे साहेब यांचे अनमोल असे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. सध्या मा.श्री राधुजी साळुजी कोळपे, रा.कोळपेवाडी, ता.कोपरगाव हे संस्थेचे विद्यमान चेअरमन आहेत व मा.श्री.सोपानराव गंगाधर गुडघे, रा.सोनेवाडी, ता.कोपरगाव, हे व्हाईस चेअरमनपदी कामकाज पहात आहेत. बँकेचे मॅनेजर म्हणुन मा.श्री बाळासाहेब दत्तात्रय काळे, रा.माहेगाव देशमुख हे काम पहातात. 

    तसेच संस्थेत व्यवस्थापकीय संचालक मंडळ ११ सदस्यांचे असुन एकुण ९ कर्मचारी आज मितीस काम करत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र संपुर्ण कोपरगांव व राहाता तालुका असुन संस्थेने यशस्वी वाटचाल करुन सर्व स्थरांवर भरीव प्रगती केलेली आहे. ३१ मार्च २०१८ अखेर संस्थेचे एकुण सभासद संख्या ११८१ इतकी आहे. तसेच वसुल भागभांडवल रु. ५९ लाख ८७ हजारांचे आहे. अहवाल सालात संस्थेचा एकुण निधी ४ कोटी ९१ लाख ५९ हजारांचे आहे आणि खेळते भांडवल रु.३० कोटी २८ लाख २० हजाराचे आहे. संस्थेस सतत ऑडीट वर्ग ‘’अ’’ मिळत आहे, ही अभिमानाची बाब असुन सभासदांना १५ टक्के दराने डिव्हीडंड दिला जात आहे. 

    संस्थेच्या अहवाल सालात एकुण ठेवी रुपये २३ कोटी १४ हजाराच्या असुन संस्थेने रुपये १५ कोटी २८ लाखांचे कर्ज वाटप केलेले आहे. संस्थेच्या कर्जवाटपाचे सर्व श्रेय कर्मवीर शंकरराव काळे स.सा.का.लि.कारखान्यांचे कामगार, सभासद बंधु व परिसरातील छोटे - मोठे व्यवसायिक यांनाच आहे. 

    संस्थेने निधीची गुंतवणुक सहकारी कायदा कानुन मधील तरतुदी नुसार रुपये १४ कोटी ३५ लाख रुपयांची केलेली आहे. संस्थेचे थकबाकी प्रमाण हे ४.०६ टक्के इतके आहे व अहवाल सालात एन पी.ए.१० टक्केच्या आत असुन एन पी.ए. ची तरतुद ३ कोटी २३ लाखांची केली आहे. संस्थेचे सर्व व्यवहार संगणीकृत असुन अल्प व्याज दरात सोनेतारण कर्ज, कॅश क्रेडीट कर्ज, पगारापोटी कर्ज, मशिनरी तारण कर्ज, वाहनतारण कर्ज, मुदतठेव तारण कर्ज इत्यादी सुविधा संस्था देत आहे. यामुळे परिसरातील गरजुना आर्थिक साह्य मिळत आहे. 

    आदरणीय मा.खासदार स्वर्गीय काळे साहेबांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन संस्था वाटचाल करत आहे. तसेच संस्थेच्या प्रगतीत संस्थेचे सभासद, खातेदार, कर्जदार, ठेवीदार व संस्थेचा कर्मचारी वृंद तसेच विद्यमान संचालक मंडळांचे मोलाचे योगदान मिळत आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना
 सेवकांची सहकारी पतपेढी लि.,गौतमनगर

पो.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर

Mobirise
Mobirise

    कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब यांचे प्रेरणेने १५ जुलै १९५७ रोजी कोसाका पगारदार नोकरांची सहकारी पतपेढी लि., गौतमनगर ही कामगारांची सहकारी संस्था स्थापन झाली असुन संस्थेचा रजि. नं. २३१८९ आहे. संस्थेकडुन सन २०१४ मध्ये कर्मवीर शंकरराव काळे सह.साखर कारखाना सेवकांची सहकारी पतपेढी लि.,गौतमनगर असे नामांतर करणेत आले. कामगारांचे सहकारी पतपेढीस विद्यमान जेष्ठ संचालक मा. आमदार श्री. अशोकरावजी काळेसाहेब तसेच युवा नेते कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा.श्री. आशुतोष काळेसाहेब यांचे कुशल मार्गदर्शन आणि मा. सौ. पुष्पाताई काळे, अध्यक्षा, प्रियदर्शनी महिला मंडळ, कोपरगांव तसेच मा. सौ. चैतालीताई काळे, संचालक, दि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अहमदनगर यांचे बहुमोल सहकार्य लाभले असुन संस्था कायमच प्रगती पथावर कार्यरत आहे. संस्थेने सहकार खात्याचे व्यवस्थापन व माहिती प्रणालीचे सर्व निकष सांभाळले असून संस्थेचे अतिशय चांगल्या प्रकारचे कामकाज चालु आहे. संस्थेचे १० संचालक मंडळाचे व्यवस्थापन असुन २० कामगार कार्यरत आहेत.

     साखर कामगारांचे जिवनमान उंचावणेसाठी व सभासदांचे तसेच परिसरातील जनतेच्या सर्व आर्थिक गरजा पुर्ण करणेसाठी संस्थेने वारणा बझारचे धर्तीवर आधारीत कारखाना कार्यस्थळावर भव्य कोसाका बझार या इमारतीची उभारणी करुन सभासद आणि कारखाना परिसरातील जनतेचे सोयीकरीता कंझ्युमर्स विभाग, कापड विभाग, सभासद व कामगार साखर विभाग, स्वस्त धान्य विभाग, स्टिल भांडी व स्टेशनरी विभाग, पिठाची गिरणी विभाग, कर्मवीर शंकरराव काळे सहकार सभागृह विभाग (मंगल कार्यालय), कर्ज विभाग इ. विभाग चालवित आहे. तसेच कारखान्याचे सहकार्याने ७ लाखाचे नविन विस्तारीत भोजन कक्ष बांधले आहे. संस्थेचा कंझ्युमर्स विभाग हा १०० टके संगणीकीकृत झाला असुन अद्यावत मॉल पध्दतीने आकर्षक पॅकिंग सुविधा व मालाची निवड आणि बारकोड पध्दत वापरुन सर्व मालाची विक्री केली जाते. सभासदांना १०० टके क्रेडिटवर मालाची विक्री केली जाते. संस्था सभासदांकरीता मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करुन रास्त दरात विक्री केली जाते. काही माल हा ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री केला जातो. संस्थेस कायमच ऑडिट वर्ग ‘अ’ मिळत आहे. जिल्ह्यातील एक आदर्श सहकारी संस्था म्हणुन संस्थेचा नावलौकीक आहे. 

    संस्थेने नुकतेच ६१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. संस्थेचे सध्या कारखान्याचे शुगर विभाग आणि डिस्टीलरी विभाग यांचेकडील मिळून ४६७ अ वर्ग सभासद असुन २९९ मात्र नाममात्र सभासद आहेत. संस्थेचे खेळते भांडवल ५ कोटी ९० लाखाचे झालेले आहे. संस्थेचे सभासदांकडील भागभांडवल १ कोटी ६६ लाख आहे. संस्थेचा रिझर्व्ह फंड ४५ लाखांचा असुन त्याची अ.नगर जिल्हा सहकारी बँकेत गुंतवणुक केलेली आहे. सहकारी बँकेकडुन संस्थेने २ कोटी २० लाख मात्रचे कर्ज घेतलेले असुन दर वर्षी सदर कर्जाचा नियमीत भरणा केला जातो. संस्थेकडे सभासदांच्या सक्तीची बचत ठेवी व ऐच्छीक ठेवी १ कोटी २ लाखांच्या असुन बॅंक गुंतवणूक ९५ लाख ५५ हजार केलेली आहे. संस्था सभासदांना ४ लाखापर्यंत आणि नाममात्र सिझनल सभासदांना १.५० लाखापर्यंत कर्ज देते. तसेच २० हजार पर्यंत आकस्मित (तात्काळ) कर्ज देते. संस्थेचे एकुण कर्ज रक्कम रुपये ३ कोटी ३३ लाख मात्रचे येणे असुन कुठलीही थकबाकी नाही. 

    नैसर्गिक अडचणीचे काळातही संस्था सभासदांसाठी भरीव कार्य करत असून नेहमीच सहकार्य करते. !! एकमेंका साह्य करु अवघे धरु सुपंथ !! या सहकारातील ऊक्तीप्रमाणे संस्थेकडे सार्थ अभिमानाने पाहिले जाते. संस्था दरवर्षी सामाजिक उत्सवामध्ये प्रामुख्याने गणेश पुजा, लक्ष्मी पुजा इ. उत्सव साजरे करते आणि त्याच बरोबर दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेत सामाजिक कार्यक्रमामध्ये सभासदांचा गौरव मान्यवरांचे शुभहस्ते केला जातो. तसेच शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना उत्तेजन दिले जाते. 

कोपरगाव तालुका सहकारी कापुस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटी लि.

पो.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर

Mobirise

    सन १९६० साली कोपरगांव तालुक्यात मोठया प्रमाणात कापुस पिकत असे त्यामुळे कोपरगांव येथे कोपरगांव तालुका सहकारी कापुस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटी लि. या सहकारी तत्वावरील संस्थेची स्थापना माजी खासदार मा. कै.शंकररावजी काळे साहेब यांनी केली. सदर संस्था सुरवातीच्या काळात बरीच वर्ष फायद्यात चालली, परंतु पुढे कोपरगांव तालुका व परीसरात पाऊस कमी झाल्याने तसेच कापुस हंगामात कापसाच्या पिकाला पाणी मिळेनासे झाल्यामुळे कापसाचे पिक कमी झाले त्यामुळे संस्था तोटयात गेली. जिनिंग व प्रेसिंग हा हंगामी व्यवसाय असून सरकारी मदत मिळत नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला. या गोष्टी लक्षात घेऊन माजी खासदार शंकरराव काळे साहेब व माजी आमदार मा.श्री. अशोकराव काळे साहेब यांनी या व्यवसायाला पुरक असा जोडधंदा म्हणून सन १९९३ साली कोरूगेटेड बॉक्सेसचे युनिट सुरू केले व जिनिंग व प्रेसिंग ही संस्था जिवंत ठेवली. सदर युनिट मधुन तयार होणा-या बॉक्सेसचा पुरवठा कारखान्याचे डिस्टीलरी विभागास त्यांच्या मागणीनुसार चालु केला.

     तसेच संस्थेने व्यापारी संकुलाची उभारणी केलेली आहे. सदर व्यापारी संकुलात १२ व्यापारी गाळे चालु झालेले आहे. तसेच शेतक-यांच्या मालाचे अचुक वजन होण्यासाठी सन २००५ साली संस्थेने ४० टनी इलेट्रॉनिक वजन काटा चालु केलेला आहे, त्यामुळे संस्थेच्या उत्पन्नात भर पडलेली आहे. तसेच सन २०११ पासून संस्थेने डिस्टीलरी विभागास १००% कोरूगेटेड बॉक्सेसचा पुरवठा चालु केलेला आहे. बॉक्सेसची क्वॉलीटी चांगली यावी यासाठी संस्थेने सन २०१४ साली चायना मेक अॅटोमॅटीक प्रिंटींग व स्लॉटींग मशिनरी खरेदी केलेले आहे त्यामुळे डिस्टीलरी विभागास चांगल्या प्रतीचा बॉक्सेसचा पुरवठा चालु आहे. मा.आमदार श्री.अशोकराव काळे साहेब यांच्या प्रयत्नाने व सहकार्याने संस्था प्रगती पथावर आहे. 

    तसेच सध्या मा.श्री.आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज चालु आहे मा.आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्याने संस्थेने सन २०१७ साली पार्टीशन बनविण्यासाठी चायना मेक पार्टीशन मशिनरी खरेदी केलेले आहे. त्यामुळे संस्थेचा व्यवसाय वाढुन उत्पन्नात भर पडली आहे. संस्थेमार्फत कारखान्याचे डिस्टीलरी विभागास ५० ते ६० टक्के पार्टीशनचा व ५० टक्के प्लेटचा पुरवठा चालु केलेला आहे.

    तसेच सध्या मा.आशुतोषदादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे चेअरमन- मा.श्री.गोरक्षनाथ ज्ञानदेव जामदार, व्हा.चेअरमन- मा.श्री.सचिन वसंतराव आव्हाड तसेच संचालक मंडळातील सदस्य व संस्थेचे जनरल मॅनेजर- श्री.सुरेश निवॄत्ती काशिद यांनी संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी चांगल्या प्रकारे काम केलेले आहे व करीत आहे. तसेच संस्थेला भविष्यात आणखी काही उद्योग व व्यवसाय सुरू करावयाचे आहेत.

Made with ‌

HTML Website Builder